Talegaon Dabhade : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त डोळसनाथ मंदिर 5100 दिव्यांनी उजळणार!

एमपीसी न्यूज – श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था आणि नगरसेवक संतोषभाऊ भेगडे स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त तळेगावचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिरात दीप प्रज्वलन करण्यात येणार आहे. यामध्ये 5100 दिव्यांनी डोळसनाथ महाराज मंदिर उजळून निघणार आहे. 

गुरुवारी (दि.18) सायंकाळी साडेसहा वाजता होणाऱ्या या उपक्रमात नागरिकांनी सहभागी होऊन एक दिवा प्रज्वलित करावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कार्यक्रमाचे निमंत्रक तळेगाव नगरपरिषदेचे नगरसेवक व पुणे महानगर नियोजन समितीचे नवनिर्वाचित सदस्य संतोष भेगडे आणि श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष शरद भोंगाडे यांच्याकडून या भव्यदिव्य दीपोत्सवात सहभागी होऊन या प्रकाशमय वातावरणाचा आनंद घेण्यासाठी तळेगावकर व पंचक्रोशीतील नागरीकांनी उपस्थित राहावे अशी विनंती करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.