Pimpri News: महापालिका विषय समिती सभापतीपदांची बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समिती सभापतीपदी स्वीनल म्हेत्रे, महिला व बालकल्याण समिती सविता खुळे, शहर सुधारणा समिती अनुराधा गोरखे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती प्रा. उत्तम केंदळे आणि शिक्षण समिती सभापतीपदी माधवी राजापुरे यांची आज (गुरुवारी) बिनविरोध निवड झाली.

महापालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती पदाच्या निवडणूकीसाठी महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामधील माजी महापौर दिवंगत मधुकर पवळे सभागृहात समितीनिहाय विशेष सभा घेण्यात आली. पुणे विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी या सभांचे पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. निवडणूकीच्यावेळी उपायुक्त अजय चारठाणकर, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे आदी उपस्थित होते. नगरसचिव उल्हास जगताप यांनी सर्व सभांचे कामकाज पाहिले.

नवनिर्वाचित विषय समिती सभापतींचे महापौर उषा ढोरे, उपमहापौर हिराबाई घुले तसेच सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी अभिनंदन केले. शहर सुधारणा समिती सभापती बिनविरोध निवड झाल्याबद्दल अनुराधा गोरखे यांचा प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भाजपचे परदेश सचिव अमित गोरखे, अ प्रभाग अध्यक्ष शैलेश मोरे, नगरसेवक तुषार हिंगे, नगरसेविका शर्मिला बाबर, राजू दुर्गे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.