Talegaon Dabhade : तळेगाव स्टेशनला जोडणा-या रेल्वे भुयारी पुलाचे लवकरच लोकार्पण 

एमपीसी न्यूज- तळेगाव स्टेशनला जोडणा-या रेल्वे भुयारी पुलाचे काम अंतिम टप्यात असून लवकरच या पुलाचे लोकार्पण केले जाईल. असे मुख्याधिकारी वैभव आवारे व शहर अभियंता एम.जी.बनसोडे यांनी सांगितले.

तळेगाव स्टेशन चौक येथील भेडसावणारी वाहतूक समस्या डोळ्यासमोर ठेवून दुचाकी व चारचाकी वाहनांना तळेगाव स्टेशन व त्याला जोडणारा माळवाडी,वराळे आदी गावांना सहजपणे जाता यावे यासाठी पर्याय म्हणून या भुयारी पुलाचे काम जुलै 2017 मध्ये सुरु केले. केवळ 22 महिन्यामध्ये या भुयारी पुलाचे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. याशिवाय जोशीवाडी व इतर भागातील जोडरस्त्याची कामे पूर्ण होत आहेत. तर नगरपरिषदेच्या बाजूचा रस्ता देखील पूर्ण झाला असल्याची माहिती बनसोडे यांनी दिली.

या रस्त्याला एकूण 10 कोटी 31 लाख खर्च मंजूर असून त्याप्रमाणे कामात प्रगती आहे. या रस्त्यावर जाणारी वाहने किती उंचीपर्यंत असावी यासाठी हाईट गेज बसवणे बाकी असून त्याच बरोबर काही किरकोळ कामे पूर्ण झाल्यावर लवकरच हा वापरासाठी लोकार्पण केला जाईल. असे आवारे यांनी सांगितले.

या भुयारी रस्त्यामुळे तळेगाव स्टेशन, यशवंतनगर, जनरल हाॅस्पिटल, इंद्रायणी महाविद्यालय, मनोहरनगर आदी भागासह भाजी मंडईला जाणे सोपे व सोयीस्कर होईल. हा भुयारी पूल लवकरात लवकर  वाहतुकीसाठी सुरु व्हावा अशी  तळेगाव स्टेशन चौकातील वाहतुकीला रोज तोंड देणा-याप्रवाशांची मागणी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.