Chinchwad : बीव्हीजी इंडिया कंपनीच्या 160 एलईडी स्क्रीनची परस्पर विक्री; चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – बीव्हीजी इंडिया कंपनीच्या 35 लाख 28 हजार रुपये किमतीच्या 160 एलईडी स्क्रीन काढून त्याची कंपनीच्या परस्पर विक्री केली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्षद राजकुमार पाटील (वय 35, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पराग विश्वासराव मोरे, प्रशांत नारायण सद्रीक, शोयब बशीद सय्यद, राघव सदाशिव कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीव्हीजी इंडिया कंपनीने विविध उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी शहरात एलईडी स्क्रीन लावल्या आहेत. 2016 ते मार्च 2019 या कालावधीत आरोपींनी त्यातील 35 लाख 28 हजार रुपये किमतीच्या 160 एलईडी टीव्ही काढून त्यांची कंपनीच्या परस्पर विक्री केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.