Talegaon-Dabhade : घरासमोर लघुशंका करण्यास रोखले म्हणून शिवीगाळ करत विनयभंग

एमपीसी न्यूज : घरासमोर लघुशंका करण्यास रोखले म्हणून पाच ते सहा जणांनी महिलेला शिवीगाळ करत तिच्या मुलाला मारहाण केली आहे. (Talegaon-Dabhade) हा प्रकार तळेगाव दाभाडे येथे सोमवारी (दि.3) सकाळी नऊच्या सुमारास घडला.

याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार तळेगाव पोलीस ठाण्यात उमाकांत किसनराव पवार (वय66),चेतन उमाकांत पवार (वय40),नितीन उमाकांत पवार (वय 37),तुषार उमाकांत पवार (वय 33),मेफुज व मामु (पुर्णनाव माहिती नाही) सर्व राहणार तळेगाव दाभाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime news : पिकांची नासधुसकरत शेतकरी महिलेला जागा सोडून जाण्याची धमकी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरासमोर आरोपी मेहफुज हा लघुशंका करत होता. यावेळी फिर्यादी त्यांना हटकले व घरासमोर लघुशंका करण्यास मनाई केली.(Talegaon-Dabhade) मेहफुज हा उमाकांत याचा कामगार आहे.याचा राग येवून इतर आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच फिर्यादीच्या मुलाला लाकडी दांडके,लोखंडी रॉड ने मारहाण करत जखमी केले. तसेच महिलेला अश्लिल भाषेत शिवीगाळ करत तिचा विनयभंग केला.यावरून तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.