Talegaon Dabhade: नगरपरिषद शिक्षण समितीतर्फे कोरोना जनजागृती कार्यशाळा

एमपीसी न्यूज – तळेगांव दाभाडे नगरपरिषद शिक्षण समितीच्या वतीने शुक्रवारी  (13 मार्च) केंद्रस्तरीय करोना व्हायरस संबंधी जनजागृती कार्यशाळा नगरपरिषदेच्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेसाठी तळेगांव दाभाडे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण कानडे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, नगरसेविका संगीता शेळके, प्रशासन अधिकारी संपत गावडे, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य व प्रत्येक शाळेतील एक शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.

शिक्षकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे डॉ. कानडे यांनी दिली. याप्रसंगी शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी संपत गावडे व उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी मार्गदर्शन केले . तसेच शालेय स्तरावर पालक व विद्यार्थी यांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन गावडे यांनी केले.

याप्रसंगी नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक यांनी आभार मानले व कार्यशाळेची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.