Talegaon Dabhade : इंद्रपुरीतील अनेक वर्षांचा रस्त्याचा प्रश्न मार्गी; आमदार शेळके यांच्या हस्ते सात रस्त्यांचे लोकार्पण

एमपीसी न्यूज – इंद्रपुरी कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांचा प्रलंबित (Talegaon Dabhade) प्रश्न मार्गी लागला असून या रस्त्यांचे लोकार्पण मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते रविवारी (दि. 11) करण्यात आले. एकूण सात रस्ते आणि बंदिस्त गटार पावसाळ्यापूर्वी बांधून झाली आहे. या कामासाठी एक कोटी वीस लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला.

या कार्यक्रमास महेश शेंडकर, उद्योजक निलेश राक्षे, चंद्रकांत दाभाडे, गणेश थिटे, नारायण मालपोटे तसेच सोसायटीतील रहिवासी नागरिक उपस्थित होते.

Maharashtra News : कंत्राटी ग्रामसेवकांना मिळणार 16 हजार रुपये मानधन

जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या इंद्रपुरी कॉलनीत 110 भूखंड आहेत.यामध्ये 13 रहिवासी सोसायट्या असून 35 भूखंडावर फार्म हाऊस,रो हाऊस, हॉटेल,कंपन्या आहेत.

इतर 11 ठिकाणी विविध कामे सुरु आहेत. येथील रहिवासी (Talegaon Dabhade) सोसाट्यांमधील सुमारे दोनशे सदनिकांमध्ये सुमारे दोन हजार नागरिक राहत आहेत. मागील सहा वर्षांपासून हे रहिवासी मूलभूत सुविधांपासून वंचित होते. येथील रहिवाशांच्या समस्यांकडे प्रशासन व बिल्डर्स यांनी डोळेझाक केल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता.

सोसायटी धारकांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून कॉलनीतील बंदिस्त गटार बांधणे तसेच सुमारे एक कोटी वीस लक्ष निधीतुन ग्रीन व्हीव सोसायटी ते साईसिद्धी सोसायटी रस्ता,अपेक्स सोसायटी ते बोध क्लासिक सोसायटी  रस्ता, महामार्ग ते लक्ष्मी सोसायटी रस्ता, हॉटेल थंडा मामला मागे इंद्रपुरी सोसायटी रस्ता,ग्रीन व्हीव ते प्रथमा हाईट्स सोसायटी रस्ता,अपेक्स सोसायटी ते लक्ष्मी आंगण सोसायटी रस्ता,महामार्ग ते अपेक्स सोसायटीकडे जाणारा रस्ता अशा एकूण सात रस्त्यांची कामे पावसाळ्यापुर्वी पूर्ण झाली आहेत.त्यामुळे येथील नागरिकांनी आमदार शेळके यांचे आभार मानले आहेत.

“सोसायटी धारकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मागील दोन वर्षांत इंद्रपुरी कॉलनीतील मूलभूत सुविधांचे प्रश्न मार्गी लावू शकलो,याचे समाधान आहे.”असे आमदार सुनिल शेळके या प्रसंगी म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.