Talegaon : तळेगावातील फारश्पिलेर्न अकादमी या जर्मन अकादमीचे स्नेहसंमेलन दणक्यात साजरे

एमपीसी न्यूज : जागतिकीकरणाने जवळ आलेल्या (Talegaon) आजच्या जगात संस्कृतीच्या कक्षा मिटत चालल्या आहेत. त्यामुळे बाहेरील देशातील भाषा येणे व त्यांची संस्कृती समजता येणे यात फरक आहे. हा फरक ओळखून फारश्पिलेर्न अकादमी त्यांच्या विद्यार्थ्यांना अधिक सुजाण, सजग व शिक्षित करण्याचे काम विविध दृष्टीकोनांतून करत आहे. याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन होय. दरवर्षी हा कार्यक्रम शैक्षणिक सहल झाल्यावर आयोजित केला जातो. यंदा या स्नेहसंमेलनाचे तिसरे वर्ष.

यावर्षी 24 डिसेंबर रोजी फारश्पिलेर्न अकादमीने फारश्पिलेर्न ट्रेफेन (वार्षिक स्नेहसंमेलन) हा कार्यक्रम प्रेक्षकांसमोर सादर केला. या कार्यक्रमात जर्मन व भारतीय संस्कृतींचा सुंदर मेळ घालण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात पारंपारिक पद्धतीने सुरेश साखवळकर, गिरिजा जोशी आणि अडॅ .रवींद्र ऊर्फ नाना दाभाडे या मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन व गणेश वंदनेने ‌झाली. त्यानंतर भरतनाट्यम या पारंपारिक नृत्य शैलीतील पुष्पांजली ही नृत्य रचना सादर केली गेली. त्यानंतर जर्मन व मराठी भाषेतील सामाईक उच्चाराचे शब्द व त्यांच्या अर्थातून झालेला अनर्थ यावर आधारीत एक प्रहसन मराठीतून सादर केले गेले.

Maharashtra : ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत विकासाचा रोडमॅप सादर करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

कार्यक्रमाच्या मध्यतंरा्च्या अगोदर डाड या जर्मन संस्थेच्या एकूण चार राज्यांच्या रिजनल ऑफिसर सौ. गिरीजा जोशी यांनी करिअर व शिक्षणाच्या दृष्टीने जर्मन भाषेच्या या जर्मनीमधील संधींबद्दल माहितीपूर्ण व्याख्यान दिले.

कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढत जात शैक्षणिक सहल 2022 व 2023 चे पुस्तक प्रकाशन व विद्यार्थी गुणगौरव त्याचप्रमाणे अकादमीच्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याने विद्यार्थ्यांची उत्कंठा वाढवली. जर्मन व बॉलिवूड गाण्यावरील नृत्यरचनांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. जर्मन भाषेतील नाटकाचाही प्रेक्षकांनी यात आस्वाद घेतला. त्याचबरोबर जर्मन व मराठी गाण्यांचा आस्वाद घेत कार्यक्रमाची सांगता एका भैरवीने (Talegaon) केली गेली. कार्यक्रमाचे नियोजन कु. रचना वळवडे व आयोजन अकादमीचे संचालक सौ. रुचा वळवडे आणि श्रीधर वळवडे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.