Talegaon : मोबाईल चोरी करणाऱ्या सराईतांना अटक, 13 मोबाईल जप्त

एमपीसी न्यूज – घराचा पत्रा उचकटून  (Talegaon) घरातून मोबाईल चोरी करणाऱ्या तीन सराईतांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून 13 मोबाईल जप्त केले आहेत. ही कारवाई तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी केली आहे.

प्रज्वल बाळासाहेब मोढवे (वय 20 रा.मिंडेवाडी, मावळ), महेश दत्तात्रेय मंगळवेढेकर (वय 20 रा.आंबेगाव) गौरव सुरजभान गौतम (वय 20 रा.मिंडेवाडी, मावळ) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

काही दिवसांपूर्वी नवलाख उंब्रे येथील एका पत्र्याच्या खोलीतून पत्रा उचकटून दोन मोबाईल चोरीला गेले होते. याचा तपास करत असताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा व तांत्रिक विश्लेषणानुसार आरोपी हे मंचर येथे असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिसांनी आरोपींना दुचाकीसह अटक केले. पोलिस तपासात आरोपींवरील तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील घरफोडी व वाकड पोलीस ठाण्यातील दुचाकी (Talegaon) चोरी असे दोन गुन्हे उघडकीस आले. पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण 13 मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 1 लाख 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Alandi : दहावीत यश संपादन केल्याबद्दल ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थींनींचा सत्कार

हि कारवाई तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत सांवत, पोलीस उपनिरीक्षक पंडित अहिरे व अनिल भोसले, सहायक पोलीस फौजदार बाळासाहेब जगदाळे, सिताराम पुणेकर, पोलीस नाईक ज्ञानेश्वर सातकर, पोलीस कॉन्स्टेबल स्वराज साठे, कोळेकर, सागर पंडित, रोशन पगारे, पवार, बनसोडे, होमगार्ड दाभणे यांनी केली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.