Talegaon Crime News : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती आणि सासू विरोधात गुन्हा दाखल

0

एमपीसी न्यूज – मूल होत नसल्याच्या कारणावरून पती आणि सासूने विवाहितेला मारहाण करून छळ केला. या छळाला कंटाळून विवाहितेने 4 जून रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत पती आणि सासू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बस डेपो समोर, तळेगाव दाभाडे येथे घडली.

दत्ता पंढरीनाथ साळुंखे (वय 38, रा. भोसरी) यांनी या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. 10) फिर्याद दिली आहे. त्यानुसार दीपक अशोक चव्हाण, शारदा अशोक चव्हाण (दोघे रा. बस डेपो समोर, तळेगाव दाभाडे स्टेशन) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 21 वर्षीय पुतणी आणि आरोपी दीपक यांचा विवाह झाला होता. फिर्यादी यांच्या पुतणीला मूलबाळ होत नाही, या कारणावरून आरोपी दीपक याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच सासू शारदा हिने मूलबाळ होत नाही या कारणावरून ‘हिला सोडून दे. तुझे दुसरे लग्न लावते’, असे नेहमी टोमणे मारून त्रास दिला.

या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या पुतणीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा पती आणि सासू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment