Talegaon : कामगार नेते विशाल लोखंडे यांच्यावर तरुणांकडून शुभेच्छांचा वर्षाव

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील कामगार नेते विशाल लोखंडे यांचा वाढदिवस नुकताच झाला. त्यांना तळेगाव आणि परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

प्रमुख पाहुणे संजोग वाघेरे पाटील, मयूर जयदेव गायकवाड आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच तुषार भेगडे, रुपाली दाभाडे, नगरसेविका वैशाली दाभाडे आदींनी विशाल लोखंडे यांना शुभेच्छा दिल्या. सागर यादव, देवा सोनवणे देखील कार्यक्रमासाठी उपस्थित होते. सामाजिक न्याय मावळचे अध्यक्ष विकी लोखंडे, विक्रम घोडके, विकी नवघने, अक्षय गायकवाड, निलेश नाचण, चेतन दहिभाते, आकाश थोरवे, सागर सुतार, योगेश बोडके, संतोष भोसले, राहुल अडागळे, विनोद दहिभाते आदींनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या.

विशाल लोखंडे म्हणाले, “एमआयडीसी परिसरात स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आजपर्यंत तळेगाव परिसरातील तीन हजार पेक्षा अधिक स्थानिक तरुणांना रोजगार मिळवून दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.