Vadgaon Maval : भूमिपुत्रांना रोजगार मिळावा या मागणीसाठी कृती समितीचा तहसील कार्यालयावर मोर्चा

एमपीसी न्यूज- रोजगार व व्यवसाय कृती समितीच्या वतीने कान्हे-नायगाव परिसरातील कंपन्यांमध्ये भूमिपुत्र तरूणांना रोजगार व व्यवसाय संधी मिळाव्यात या मागणीसाठी आज, गुरुवारी वडगाव मावळ तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. रोजगार व व्यवसाय कृती समिती कान्हे-नायगाव यांच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

आज सकाळी साडेदहा वाजता पोटोबा महाराज मंदिर ते वडगाव मावळ तहसील कार्यालय असा धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चा मध्ये माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार सुनील शेळके, माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, अलकताई धानिवले, तालुका शिवसेना प्रमुख राजू खांडभोर व कृती समितीचे अध्यक्ष बंडोबा सातकर व सचिव ऍड. केतन सातकर, तसेच कार्यकारिणी सदस्य मदन शेडगे, विजय सातकर, प्रदीप ओव्हाळ, गौरव सातकर, संदीप सातकर, शशिकला सातकर कान्हे, नायगाव व जांभूळ परिसरातील असंख्य नागरिक व महिला भगिनी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नायब तहसीलदार चाटे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले…

यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे म्हणाले की कंपनीच्या माध्यमातून मिळणारा व्यवसाय व नोकरी ही स्थानिकांनाच मिळेपर्यंत हा लढा सुरू राहील. स्थानिकांना न्याय द्यायचं काम करणार असे त्यांनी आश्वासन दिले.

आमदार सुनील शेळके म्हणाले, ” तालुक्यात काम करत असताना राजकीय जोडे बाजूला ठेवून स्थानिकांना न्याय देण्याचे काम करणार ”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.