Talegaon News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या गटनेतेपदी नगरसेवक अरुण भेगडे पाटील यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषद सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी नगरसेवक अरुण जगन्नाथ भेगडे पाटील यांची तळेगाव शहर भारतीय जनता पक्षाकडून नियुक्ती करण्यात आली.

भेगडे यांना तळेगाव दाभाडे नगरपरिषद सभागृह नेते पदाचे पत्र तळेगाव शहर भाजपचे अध्यक्ष रवींद्र माने यांचे वतीने भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांचे हस्ते देण्यात आले.

यावेळी नगरसेवक संतोष दाभाडे पाटील, नगरसेविका मंगल जाधव, संध्या भेगडे, काजल गटे, प्राची हेंद्रे, सरचिटणीस विनायक भेगडे,प्रदिप गटे, माजी उपाध्यक्ष अजय भेगडे, ओबीसी मोर्चा कार्याध्यक्ष सचिन जाधव, उपाध्यक्ष गणेशआप्पा भेगडे, आशुतोष हेंद्रे उपस्थित होते.

सन 2016 मध्ये झालेल्या तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये नवनियुक्त सभागृहनेते अरुण भेगडे पाटील हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले होते. गेली चार वर्षांमध्ये आरोग्य समिती सभापती, बांधकाम समिती सभापती, स्थायी समिती सदस्य अशा जबाबदाऱ्या त्यांच्यावर पक्षाने सोपविल्या होत्या. त्या यशस्वीपणे त्यांनी पार पडल्या.

येत्या डिसेंबरमध्ये तळेगाव दाभाडे नगर परिषदेची निवडणूक होत असून एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून भेगडे यांच्यावर सोपवलेली सभागृहनेते पदाची जबाबदारी हे यशस्वीपणे पार पाडतील असे मत जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी व्यक्त केले. भेगडे यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.