Talegaon News : तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील सर्व व्यापाऱ्यांची मोफत कोरोना चाचणी करा – आमदार सुनिल शेळके

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनचे नियम सोमवार (दि. 14) पासुन शिथिल करण्यात येणार असल्याने त्यानंतर बाजारपेठेतील सर्व दुकाने सुरु होणार आहेत. मात्र शासनाच्या आदेशानुसार सर्व व्यापाऱ्यांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले असल्याने तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या हद्दीतील सर्व व्यापाऱ्यांची मोफत कोरोना चाचणी करण्यात यावी. अशी सूचना आमदार सुनिल शेळके यांनी तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे यांना केली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहर हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले होते. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दुकाने सुरु करण्या अगोदर सर्व व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. यामुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीतील सर्व व्यापाऱ्यांची मोफत कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे.

लॉकडाऊन शिथिलतेनंतर सर्व व्यापारी आस्थापना, व्यवसाय नियम व अटींच्या अधिन राहून खुले करण्यास शासनाने परवानगी दिलेली असुन त्यासाठी प्रत्येक व्यापाऱ्यास कोविड टेस्ट करणे बंधनकारक आहे. मागील वर्षापासून कोविडमुळे सर्वत्र व्यापारी बाजारपेठा मंदावलेल्या असुन त्यातच दोन महिन्यांपासून व्यापारी दुकाने जवळपास बंदच असल्याने माझे व्यापारी बांधव आर्थिक संकटात सापडलेले आहेत.तरी तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील व्यापारी बांधवांची मोफत कोविड टेस्ट करणेबाबत तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशा आशयाचे पत्र आमदार शेळके यांनी तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे व तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. जयेश बिरारी यांच्याकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.