Talegaon News : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून शहरात मोफत नेत्र चिकित्सा शिबीर

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डोळ्यांचे आजार वाढत चालले आहेत. याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. येथील रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी, रोटरी क्लब ऑफ मावळ आणि पार्वती नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबीर दि. 5 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. मोफत नेत्रचिकित्सा शिबीर, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर, पार्वती नेत्रायल, परुळेकर विद्यानिकेतन समोर, चाकण रोड तळेगाव दाभाडे येथे सकाळी 10 ते सायंकाळी 05 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर या नियमांचे पालन करुन दररोज फक्त 10 जणांची तपासणी करण्यात येणार आहे. अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांचीच मोतीबिंदूची मोफत शस्रक्रिया करण्यात येणार आहे.

या शिबीराचे उद्घाटन तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या सभापती सुलोचना आवारे यांचे हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून असिस्टंट गव्हर्नर रो. गणेश कुदळे व डायरेक्टर व्होलव्हा ग्रुप इंडियाचे जयदीप सागरे हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडिसीचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.