Talegaon News : महिंद्रा सीआयई कंपॉजिट डिव्हिजनच्या वतीने वंचित मुलांना खाऊ वाटप

एमपीसी न्यूज – तळेगाव स्टेशनवरील नाचकिंड वस्तीमधील वंचित मुलांना उर्से येथील महिंद्रा सीआयई कंपॉजिट डिव्हिजनच्या वतीने सुकामेवा वाटप करण्यात आले. कंपनीने सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला.

या कार्यक्रमासाठी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे उपस्थित होत्या. यावेळी सोनबा गोपाळे गुरुजी, महिंद्राचे अधिकारी सागर पवार, संदिप पानसरे, हरिश कोटेकर, सौरभ जांभळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.

कंपनीच्या सामाजिक बांधीलकीतून समाजातील वंचित घटकांना मदत केली जाते. गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, वृद्धांना आधार, दिव्यांगांना मदत केली जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.