Talegaon News : नगरपरिषद हद्दीमध्ये कोविड 19 अंतर्गत तातडीच्या उपायोजनांची गरज – चित्रा जगनाडे

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीमध्ये covid-19 अंतर्गत नगराध्यक्षांच्या हक्क व अधिकारांमध्ये तातडीने उपायोजना कराव्यात, असे पत्र तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी मुख्याधिकारी यांना दिले आहे.

महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नागरी अधिनियम कलम 58 (2) नुसार निकडीची परिस्थिती निर्माण होईल तेव्हा नगराध्यक्ष या नात्याने मंजुरीची आवश्यकता असेल आणि लोकांच्या सुरक्षिततेच्या, सेवेच्या दृष्टीने अंमलात आणणे, असे पत्रामध्ये नमूद केले आहे.

यामध्ये नगरपरिषद हद्दीमध्ये भाजीपाला व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांची अँटीजेन टेस्ट करणे बंधनकारक राहील, तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीमध्ये प्रत्येक प्रभागांसाठी अँटीजेन टेस्ट करण्यात येईल,  चार जणांची मिळून एक टीम करणे अशा सात टीम तयार करण्यात याव्यात. त्यांनी रोज एक प्रभाग तपासणी करावयाची आहे. त्यासाठी लागणाऱ्या टेक्निकलची गरज आरोग्य समितीचे सभापती किशोर भेगडे व जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे पूर्ण करतील, मागणी नुसार 50 ऑक्सिजन बेडची तरतूद करणे,  अँटीजन टेस्ट, ऑक्सीजन बेड तयार करणे, ऑक्सिजन कीट निर्माण करणे आदी बाबींची मागणी मावळ तालुका आरोग्य प्रमुख यांच्याकडे करावी.

तसेच स्थापन केलेल्या 50 बेडवरील रुग्णांना व नातेवाईकांना नगरपरिषदेकडून जेवणाची व्यवस्था करणे, आदी सूचना नगराध्यक्षांनी आपल्या हक्क व अधिकारामध्ये दिलेल्या पत्रामध्ये नमूद केलेल्या आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.