Talegaon : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार; तरुणी गर्भवती राहिल्याने प्रकार उघडकीस

एमपीसी न्यूज – तरुणीला लग्नाचे अमिश दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. त्यातून ती गर्भवती राहिली आणि हा प्रकार उघडकीस आला. ही घटना 15 डिसेंबर 2018 ते 19 डिसेंबर 2019 या कालावधीत शेलारवाडी, तळेगाव दाभाडे, एल जे लॉज देहूगाव, रामनगर वारजे, एनडीए पुणे या ठिकाणी घडली.

नितीन सुधाकर तुपे (वय 25, रा. रामनगर, वारजे, पुणे. मूळ रा. शेलारवाडी, तळेगाव दाभाडे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी २१ वर्षीय तरुणीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. तिच्याशी गोड बोलून जवळीक वाढवून 15 डिसेंबर 2018 ते 19 डिसेंबर 2019 या कालावधीत शेलारवाडी, तळेगाव दाभाडे, एल जे लॉज देहूगाव, रामनगर वारजे, एनडीए पुणे या ठिकाणीनेऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केला. फिर्यादी तरुणी दोन महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.