Talegaon : सुनील शेळके यांच्या गावभेट दौऱ्यास उद्यापासून उर्से येथून पुन्हा प्रारंभ

एमपीसी न्यूज – मावळ विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असलेले तळेगाव दाभाडेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांच्या गावभेट दौऱ्याला उद्या (मंगळवार, दि. २०) सकाळी साडेनऊ वाजता उर्से येथून पुन्हा सुरूवात होत आहे. तालुक्यातील अतिवृष्टीने हा दौरा 16 दिवस स्थगित ठेवण्यात आला होता.

सुनील शेळके यांनी गेल्या पाच वर्षांत मावळ तालुक्यात विविध कार्यक्रम व विकासकामांच्या माध्यमातून गावोगाव संपर्क वाढवत जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. निवडणुका तोंडावर आलेल्या असताना त्यांनी भाजपचा झेंडा घेऊन गाव भेट दौरा सुरू केला आहे. जोरदार शक्तीप्रदर्शन करीत त्यांनी तीन ऑगस्टला शिरगाव येथून या दौऱ्यास प्रारंभ केला.

  • पहिल्या दिवशी शिरगाव, गहुंजे, साळुंब्रे, गोडुंब्रे, सांगवडे, दारुंब्रे, चांदखेड, बेबेडओहोळ, धामणे, परंदवडी व सोमाटणे या गावांना शेळके यांनी भेट दिली व गामस्थांशी संवाद साधला. पाऊस असतानाही प्रत्येक गावात शेळके यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले, मात्र त्यानंतर तालुक्यात अतिवृष्टी सुरू झाल्याने ग्रामस्थ व कार्यकर्त्यांच्या सुरक्षितेचा विचार करून हा दौरा स्थगित करण्यात आला होता.

गावभेट दौऱ्यात शेळके उद्या (मंगळवारी) उर्से, आढे, ओझर्डे, सडवली, बौर, बौरवाडी, आर्डव, येलघोल, धनगव्हाण, भडवली, शिवली, कोथुर्णे, मळवंडी ठुले आणि वारू या गावांमधील ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.