Talegaon : मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेत विक्रमी 329 स्पर्धक सहभागी

एमपीसी न्यूज – कलापिनी तळेगाव दाभाडे आणि साने गुरुजी कथामाला, दासबोध अभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेचे हे 25 वे वर्ष होते. स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी बालवाडी ते 10 वी व खुल्या गटासाठी घेण्यात आली. स्पर्धेत 329 स्पर्धाकांनी सहभाग घेतला होता. विविध गटात मुली व महिलांचे वर्चस्व प्रस्थापित झाले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून समर्थ भक्त, अभ्यासक व शास्त्रञ् श्री व सौ श्रीराम सबनीस, जायंट इंटरनॅशनल तळेगाव शाखेचे संस्थापक संदीप गोंदेगावे व जायंट ग्रुप इंटरनॅशनलचे अध्यक्ष अण्णाराव कोळी, समर्थ सेवा मंडळाचे सुभाष नाईक गुरुजी, जनता सहकारी बँकेचे सुरेंद्र थिटे व शिक्षणतज्ञ् डॉ आनंद वाडदेकर उपस्थित होते.

  • स्पर्धाप्रमुख अशोक बकरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ अनंत परांजपे यांनी स्पर्धेतील सहभागाबद्दल व रौप्यमहोत्सवी वाटचालीबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. मोरेश्वर होनप यांनी प्रमुख पाहुणे श्रीराम सबनीस यांचा परिचय करून दिला. सबनीस यांनी मनाच्या श्लोकांचे वृत्त भुजंग प्रयाग असून त्याचे पठाणाने मानसिक व शारीरिक व्याधींवर चांगला परिणाम होतो व बुद्धी व एकाग्रता वाढते असे सांगितले. अण्णाराव कोळी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले व जायंट इंटरनॅशनल क्लब, मनाच्या श्लोकांच्या स्पर्धेसाठी सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे असे सांगितले.

शालिनी झगडे व मुग्धा गोखले यांनी सतत दोन दिवस स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पहिले. परीक्षक शालिनी झगडे आपले मनोगत व्यक्त करताना श्लोकांच्या उच्चाराकडे जास्त लक्ष द्यावे, मोठ्या मुलांनी व मराठी माध्यमिक शाळांनी या स्पर्धेत अधिक भाग घ्यावा, असे सांगितले. मान्यवरांचा व परीक्षकांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आले.

  • रौप्य महोत्त्सवानिमित्त गेली २५ वर्षे या स्पर्धेचे संचालक अशोक बकरे यांचा सत्कार करण्यात आला. विशाखा बेके यांनी सूत्र संचालन केले व चैतन्य जोशी यांनी आभार मानले. मुकुंद इनामदार, ,श्रीपाद बुरसे, रामचंद्र रानडे, दीपक जयवंत, श्री व सौ पांढरे, किसान शिंदे, पांडुरंग देशमुख, श्री व सौ बेलसरे, विनया मायदेव, प्रतीक मेहता, आदित्य धामणकर, हरीश पाटील, जितेंद्र पटेल, शार्दूल गद्रे, ऋचा गुजरपाध्ये यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी साहाय्य केले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे: गट: बालवाडी, ज्युनिअर, सिनियर, केजी. प्रथम: संस्कृती दळवी, पैसा फंड. शाळा,द्वितीय: कृष्णल भागवत, जैन इंग्लिश स्कूल,तृतीय: श्रावणी येवले, बालविकास विद्यालय .

  • उत्तेजनार्थ: स्पृहा मखामले, जैन इंग्लिश स्कूल, वेदांत माळी, बालविकास विद्यालय, शाम्भवी धर्माधिकारी, जैन इंग्लिश स्कूल, सारा देवस्थळे, जैन इंग्लिश स्कूल, समृद्धी जिड्डे, सरस्वती विद्या मंदिर, योगदा कडुस्कर, पैसे फंड शाळा

गट: १ ली व २ री – प्रथम: सिद्धी गद्रे, माउंट सेन्ट ऍन, द्वितीय: प्रांजली गोगटे, बालविकास विद्यालय, तृतीय: श्रेयस महाले, आदर्श विद्या मंदिर.
उत्तेजनार्थ: ईशान अभ्यंनकर, जैन इंग्लिश स्कूल, कृपा जगनाडे, बालविकास विद्यालय, राजवीर मोरे, आदर्श विद्या मंदिर, कनक हुंडेकरी, सह्याद्री इंग्लिश स्कूल, योगिता कोळी, आदर्श विद्या मंदिर, स्वरांजली गायकवाड, जय वकील स्कूल, मयंक बिबीकर, जय वकील स्कूल

  • गट: ३ री व ४ थी प्रथम: अवनी परांजपे, कुमार भवन कलापिनी,द्वितीय: वल्लभ गायकवाड, पैसे फंड शाळा,तृतीय: दक्ष सुतार, पैसे फंड शाळा
    उत्तेजनार्थ: वेदांत गादेकर, आदर्श विद्या मंदिर, वैष्णव पाटील, पैसे फंड शाळा, अंजली महाजन, पैसे फंड शाळा, सुमेश टसनुसे, पैसे फंड शाळा, गणेश ठोकळ, जय वकील स्कूल, तनया खोल्लम, जय वकील स्कूल, धनश्री आंबेटकर, जय वकील स्कूल, शाम्भवी जाधव, मामासाहेब खांडगे स्कूल

गट: ५ वी ते ७ वी प्रथम: जान्हवी दांडगे, रा प विद्यानिकेतन,द्वितीय: निशा जामदार, सह्याद्री इंग्लिश स्कूल,तृतीय: स्नेहल शिंदे, रा प विद्यानिकेतन. उत्तेजनार्थ: तेजस्विनी पारगे, कृष्णराव भेगडे इंग्लिश स्कूल, श्रुती नाईक, कृष्णराव भेगडे इंग्लिश स्कूल, शौनक जाधव, मामासाहेब खांडगे इंग्लिश स्कूल,

  • गट: ८ वी ते १० वी – प्रथम: मंथन जाधव, रा प विद्यानिकेतन,द्वितीय: नेहा खाणेकर, पु वा परांजपे विद्यालय, तृतीय: कल्याणी पाटील, रा प विद्यानिकेतन. खुला गट: प्रथम: पद्मजा गद्रे,द्वितीय: ज्योती भेगडे,तृतीय: ज्योती ढमाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.