Pimple Saudagar : पारूबाई झिंजुर्डे यांचे निधन

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागरमधील ज्येष्ठ नागरिक पारूबाई खंडू झिंजुर्डे यांचे अल्पशा आजाराने सोमवारी (दि. 19 ऑगस्ट) थेरगाव येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या 70 वर्षांच्या होत्या.

त्यांच्या मागे पती, तीन विवाहित मुली, दोन मुले, सूना, जावई, नातू-पणतू असा परिवार आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत ऊर्फ बबन झिंजुर्डे यांच्या त्या मातोश्री होत.

  • पारुबाई झिंजुर्डे यांचा अंत्यविधी आज सोमवारी रात्री 8 वाजता पिंपळे सौदागर स्मशानभूमी येथे होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.