Badminton player Nandu Natekar passes away : भारतीय बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे ८८ व्या वर्षी निधन

एमपीसी न्यूज : माजी बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं निधन झालंय. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. त्यांच्या निधनाने क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे. अर्जुन पुरस्कार विजेते ते पहिलेच खेळाडू होते. आज सकाळी पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आंतरराष्ट्रीय पदक मिळविणारे ते पहिले बॅडमिंटनपटू होते. त्यांच्या बहारदार खेळाबद्दल त्यांना सहा राष्ट्रीय पदके देखील मिळाली होती.

नंदू नाटेकर यांचा जन्म महाराष्ट्रातल्या सांगली येथे झाला. त्यांनी वयाच्या 20 व्या वर्षी म्हणजेच 1953 मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले. नंदू नाटेकरांच्या यांच्या निधनाची माहिती देताना त्यांच्या कुटुंबीयांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अत्यंत दु:खद अंतकरणाने आम्ही तुम्हाला माहिती देतो की, आमचे प्रिय वडील नंदू नाटेकर यांचे आज (28 जुलै) निधन झाले आहे.

१२ मे १९३३ रोजी महाराष्ट्रातील सांगली येथे जन्मलेल्या नंदकुमार नाटेकर यांनी भारताला बॅडमिंटनमध्ये अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले होते. बॅडमिंटनमध्ये भारताला परदेशात विजेतेपद मिळवून देणारे ते पहिले बॅडमिंटनपटू होते. त्यांनी १९५६ मध्ये क्वालालंपूर येथील सेलांगोर इंटरनॅशनल स्पर्धा जिंकून तेव्हा ऐतिहासिक विजयाची नोंद केली होती.

नंदू नाटेकर यांनी १०० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विजेतेपदे पटकावली होती. तसेच त्यांनी प्रत्येकी सहावेळी पुरुष एकेरी आणि दुहेरीचे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले होते. तसेच पाच वेळा मिश्र दुहेरीच्या विजेतेपदावर आपलं नाव नोंदवलं होतं.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.