Talegaon : ट्रकची टेम्पोला धडक; एक जण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – भरधाव  ट्रकने एका टेम्पोला समोरून धडक दिली. या भीषण अपघातात टेम्पो चालक गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी (दि. 7) मध्यरात्री बाराच्या सुमारास मावळ तालुक्यातील परंदवडी येथे घडला.

प्रमोदकुमार कपिलदेव चौरसिया (वय 43, रा. मुंबई. मूळ रा. बिहार) असे गंभीर जखमी झालेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी यल्लाप्पा हरिबा पात्रे (वय 39, रा. गुलबर्गा, कर्नाटक) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी एमएच 25 / यु 2247 हा ट्रक भरधाव वेगात चालवत जात होता. आरोपीच्या ट्रकने फिर्यादी यांच्या एमएच 03 / सीपी 3396 या आयचर टेम्पोला समोरून धडक दिली. यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले. तसेच दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.