Talegaon : राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांच्या मदतीला तीन बोटी आणि कार्यकर्ते सांगलीत दाखल

एमपीसी न्यूज – मदत व पुनर्वसन राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या माध्यमातून गेल्या 3 दिवसापासून सांगली पूरग्रस्तांच्या मदती करीता 50 कार्यकर्ते विविध भागात युद्ध पातळीवर मदत पोहोचवत आहेत. आज मदत व पुनर्वसन राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या माध्यमातून मावळतालुक्यातून तीन बोटी आणि कार्यकर्त्यांची टीम दाखल झाली आहे. सांगलीवर जे आस्मानी संकट उभे राहिले आहे, त्याला सामोरे जाण्यासाठी राज्यमंत्री बाळा भेगडे व कार्यकर्ते पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती यावेळी दिली.

सांगलीत सुमारे 95 बोटी कार्यरत असून सांगलीत 101 गावांतील 28,537 कुटुंब विस्थापित करण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर 35 हजार जनावरं सुद्धा विविध शिबिरांमध्ये आहेत. मोठ्या प्रमाणावर शेतजमीन बाधित झाली असून पाणी ओसरल्यावर नेमकी माहिती हाती येईल. तसेच रस्ते व बहुतेक ट्रान्सफॉर्मरचे नुकसान झाले असून कमीत कमी वेळात पूर्ववत करण्यात येणार आहेत.

  • कोल्हापूर आणि सांगली मिळून सुमारे 3,78,000 लोकांना बाहेर काढले असून दोन जिल्हे मिळून 306 छावण्यांमध्ये निवारा सुरू करण्यात आला आहे. त्याचबरोबर दोन्ही जिल्ह्यात प्रत्येकी 100 डॉक्टरांच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली 100 स्वयंसेवक विविध भागात कार्यरत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.