Talegaon : इंद्रायणी नदीत तीन विद्यार्थी बुडाले; एकाचा मृत्यू, दोघे बचावले

एमपीसी न्यूज – इंद्रायणी नदीत तीन विद्यार्थी बुडाल्याची (Talegaon) घटना मंगळवारी (दि. 25) दुपारी घडली. त्यातील एकाचा मृत्यू झाला असून दोघांना वाचविण्यात यश आले आहे.

आदित्य शरद राणे (वय 22) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

Parkash Singh Badal : पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांचं निधन

मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे येथील एका महाविद्यालयातील सहा विद्यार्थी जाधववाडी येथे इंद्रायणी नदीत पोहायला गेले. दरम्यान तिघेजण नदीमध्ये बुडाले. बुडालेल्या तिघांना वाचवण्यासाठी त्यांचे मित्र गेले असता दोघांना वाचविण्यात यश आले. मात्र, एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृत्यू झालेला विद्यार्थी हा (Talegaon) मध्य प्रदेश येथील आहे. तो अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.