Talegaon Dabhade : तळेगाव ते चोपडा बस सेवा सुरु

एमपीसी न्यूज – तळेगाव येथून जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे जाण्यासाठी(Talegaon Dabhade) बससेवा सुरु करण्यात आली आहे. तळेगाव-चोपडा बस शिर्डी, धुळे, अंमळनेर मार्गे जाणार आहे. बसला मंगळवारी (दि. 16) सकाळी साडेसहा वाजता मार्गस्थ करण्यात आले. खान्देशातील अनेक बांधव तळेगाव दाभाडे शहर परिसरात नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने वास्तव्यास आहेत. त्यांना आपल्या गावी जाण्यासाठी या बसचा चांगला उपयोग होणार आहे. याबाबत खानदेशी युवा मंचने पाठपुरावा केला होता.
यावेळी खान्देश विकास युवा मंच सहकारी पदाधिकारी.जेष्ठ समिती मधील-डॉ शालिग्राम भंडारी,डॉ रोहित मनीयार,माऊली हॉस्पीटलचे डाॅ युवराज बडे,रविंद्र बापू पाटील, मनोहर पगारे,भरत देसले,रविंद्र साळूंके,मुकेश पाटील,शिवाजी पाटील,पवार सर,नितीन पाटील, गोविंद पवार,तायडे साहेब,जयंत संदानशिव,विजयकुमार राठोड,विजय चौधरी आणि तळेगाव परिसरात राहणारे खान्देशवासी उपस्थित होते
तळेगाव दाभाडे परिसरात अनेक खानदेशी बांधव नोकरी निमित्त स्थायिक झालेले आहेत परंतु गावी जाताना मात्र त्यांना रेल्वे किंवा खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता हे खूप खर्चिक असल्याने खानदेशी युवा मंच यांच्यामार्फत तसेच आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याने आज तळेगाव दाभाडे इथून शिर्डी- धुळे -अंमळनेर- चोपडा एसटीला आज हिरवा सिग्नल मिळून आज सकाळी साडेसहाच्या सुमारास ती मार्गस्थ झाली.
याप्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी एसटीचे वाहक व चालक यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यापासून पहिल्या निवेदन दिवशी महामंडळाला तळेगाव ते चोपडा बस नियमितपणे चालू करण्यासाठी निवेदन दिले होते त्या गोष्टीला तब्बल ११ महिने पाठपुरावा सतत सुरू होता अखेर १४ एप्रिल २०२४ रोजी सकाळी साडेसहा वाजता रविवारी प्रतीक्षा संपली.
एसटी महामंडळाकडे ज्यावेळेस आम्ही जायचो  त्यावेळेस आम्हाला काही कारणास्तव नकार मिळत होता त्यासाठी आम्ही मावळ तालुक्याचे  आमदार आमदार सुनील शेळके त्यांच्याकडे जाऊन विनंती केली. मावळ तालुक्यात जवळजवळ ३० हजार लोकं वास्तव्यास आहेत म्हणून आम्हाला एक हक्काची महामंडळाची एक बस कायमस्वरूपी सुरू करून द्यावी अशी विनंती करताच त्यांनी प्रतीक्षा न करता लगेच त्यांच्या लेटर हेड वर एसटी महामंडळात देण्यासाठी निवेदन दिले व अखेर आज आमची मागणी पूर्ण झाली अशी प्रतिक्रिया उमेश पाटील व पदाधिकारी यांनी दिली मित्रपरिवार आणि खान्देश विकास युवा मंच ची वरिष्ठ समिती ११महिन्यापासुन सोबत होते असेही त्यांनी सांगितले.
तीस हजार लोकांच्या वतीने खान्देश युवा मंच च्या पदाधिकाऱ्यांनी आमदार सुनील आण्णा शेळके यांचे मनापासून आभार मानले.
दररोज सकाळी साडेसहा वाजता तळेगाव स्टेशन येथून सदर एसटी मार्गस्थ होऊन चाकण- खेड शिर्डी धुळे अमळनेर मार्गे चोपडा या ठिकाणी जाणार आहे अशी माहिती खान्देशी युवा मंच मार्फत देण्यात आली आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.