LokSabha Elections 2024 :  मावळमध्ये 114 पथके; निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणूका शांततेत व सुरळीत तसेच निकोप वातावरणात(LokSabha Elections 2024 )पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन मावळ लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी केले.

 

निवडणूक कालावधीत आदर्श आचार संहितेचे काटेकोर पणे पालन करण्यासाठी (LokSabha Elections 2024 )विविध पथकांची निर्मिती करण्यात आली असून त्यासाठी मावळ लोकसभा मतदार संघात येणाऱ्या पनवेल, कर्जत, उरण, मावळ, पिंपरी, चिंचवड अशा 6 विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 114 पथके स्थापन करण्यात आलेली आहे, असेही ते म्हणाले.

मावळ लोकसभा मतदार संघाच्या आकुर्डी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मावळ लोकसभा मतदार संघाचे निवडणूक नोंदणी अधिकारी सुरेंद्र नवले, समन्वय अधिकारी प्रविण ठाकरे, हिम्मत खराडे, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त वसंत परदेशी, सहायक पोलिस आयुक्त राजू मोरे, माध्यम कक्षाचे समन्वयक शिवप्रसाद बागडी यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

निवडणूक प्रक्रीया आणि व्यवस्थापनाबद्दल माहिती देताना दीपक सिंगला म्हणाले, मावळ लोकसभा मतदार संघाची निवडणूक चौथ्या टप्प्यात होत असून दि.18 एप्रिल रोजी निवडणूकीची सुचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्या दिवसापासून नामनिर्देशन पत्रे स्विकारण्यात येणार आहे. मावळ लोकसभा मतदार संघाचे निवडणूक कार्यालय 7 वा मजला, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आकुर्डी या ठिकाणी ही नामनिर्देशन पत्रे स्विकृत केली जातील. दि.25 एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याचा शेवटचा दिनांक असेल. दि.26 एप्रिल रोजी नामनिर्देशन पत्रांची छानणी केली जाईल तर दि.29 एप्रिल हा उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिनांक असेल. दि.13 मे रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. तर दि.4 जून रोजी मतमोजणी प्रक्रीया पार पडेल.

 

निवडणूकीच्या अनुषंगाने प्रशासनाने आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. सुमारे 18 हजार मनुष्यबळाची नियुक्ती निवडणूक कामकजासाठी करण्यात आली आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने समन्वयासाठी 16 नोडल अधिकाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत. निवडणूक प्रक्रीयेच्या प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्षांना माहिती देऊन अवगत करण्यात येणार आहे. निवडणूक कालावधीत आदर्श आचार संहितेचे काटेकोर पणे पालन करण्यासाठी विविध पथकांची निर्मिती करण्यात आली असून त्यासाठी मावळ लोकसभा मतदार संघात येणाऱ्या पनवेल, कर्जत, उरण, मावळ, पिंपरी, चिंचवड अशा 6 विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 114 पथके स्थापन करण्यात आलेली आहेत.

दिव्यांग, वयोवृध्द नागरिकांना मतदान करण्यासाठी आवश्यक सुविधा पुरविल्या जाणार आहेत. मतदान केंद्रावर देखील आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत. संपर्क व्यवस्थेमध्ये बाधा येणार नाही याबाबत दक्षता घेण्यात आली आहे. मतदान यंत्रे, मतदार संख्या याबाबत दिपक सिंगला यांनी सविस्तर माहिती दिली. शिवाय कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आलेल्या विविध प्रशिक्षणाची देखील माहिती यावेळी देण्यात आली.

 

 

Loksabha election 2024 : पक्षांतर केलेल्या नेत्यांची चांदी,पक्षप्रवेश करताच 7 जणांना उमेदवारी जाहीर

 

मतदान केंद्रामध्ये भ्रमणध्वनी घेऊन जाण्यास मनाई आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून राजकिय पक्षांना सर्व प्रकारचे सहकार्य केले जाणार असून राजकिय पक्षांनीही निवडणूका निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन सिंगला यांनी यावेळी केले.

कायदा व सुव्यवस्थेबद्दल माहिती देताना अतिरिक्त पोलिस आयुक्त वसंत परदेशी म्हणाले, पोलिस प्रशासनाद्वारे अधिकाऱ्यांनी विविध मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील आवश्यकता विचारात घेऊन प्रत्येक केंद्रावर पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात येईल. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने गुंडांवर कारवाई करण्याचे काम हाती घेतले आहे. निवडणूक प्रक्रीयेला सामोरे जाण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असून कोणीही कायदा हातात घेऊ नये.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.