Talegaon : शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडवणार -जी.के. थोरात

एमपीसी न्यूज – पुणे शिक्षक मतदारसंघाचे टीडीएफचे अधिकृत उमेदवार जी. के. थोरात यांनी सोमवारी तळेगाव स्टेशन परिसरातील परांजपे विद्यालय, नवीन समर्थ विद्यालय, रामभाऊ परूळेकर विदयानिकेतन, आदर्श विद्या मंदिर या शाळांना भेटी देऊन शिक्षकांच्या अडचणी समजावून घेतल्या. तसेच शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.

पुणे विभाग शिक्षक व पदवीधर नोंदणी अभियानाच्या दुसऱ्या टप्पात शिक्षक व पदवीधर मतदार म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2019 दरम्यान आपले फॉर्म भरून जमा करू शकता शिक्षक मतदारसाठी फॉर्म नमुना 19 नंबर भरून घ्यावा आणि पदवीधरसाठी फॉर्म नमुना 18 नंबर भरावा. त्यावर एक पासपोर्ट साईज फोटो लावावा. 1 नोव्हेंबर 2016 पूर्वी अथवा नंतर 3 वर्षे काम करीत आहेत. अशा सर्व शिक्षक नोंदणीसाठी पात्र आहेत. तसेच ज्या शिक्षकांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत. अशा सर्व शिक्षकांनी व ज्यांनी अजून फॉर्म भरले नाहीत. अशा सर्व शिक्षकांनी फॉर्म भरता येतील भरलेला फॉर्म आपण स्वतः किंवा आपापल्या संस्थेमार्फत /संघटनेमार्फत आपल्या हद्दीतील अथवा शाळेच्या जवळच्या तहसील, प्रांताधिकारी (निवडणूक अधिकारी) कार्यालयात जमा करावा.

मतपत्रिकेच्या आधारे होणाऱ्या या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क मिळविण्यासाठी आपलं नाव शिक्षक मतदार म्हणून प्रत्येकाने 9 डिसेंबर 2019 पूर्वी नव्याने रजिस्ट्रेशन करणे अत्यंत आवश्यक आहे, असे आवाहन पुणे शिक्षक मतदारसंघाचे टीडीफचे अधिकृत उमेदवार जी. के. थोरात यांनी केले आहे.

याप्रसंगी पुणे विभाग उपाध्यक्ष थोरात एस पी. माध्यमिक शिक्षक संघाचे भगवान शिंदे, शिक्षक नेते धनंजय खाडे, धनोकार उपस्थित होते. या शाळाभेट दौराचे नियोजन धनकुमार शिंदे व भाऊसाहेब खोसे व डाॅ. गाडेकर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.