Maval LokSabha Elections 2024 : पहिल्या दिवशी 27 जणांनी घेतले उमेदवारी अर्ज

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने (Maval LokSabha Elections 2024)आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली. आज दिनांक 18 एप्रिल रोजी विहित वेळेत सुमारे 27 व्यक्तींनी आकुर्डी येथील मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून नामनिर्देशन पत्र नेले आहेत. आज कोणत्याही उमेदवाराने नामनिर्देशन पत्र दाखल केले नाही.

नामनिर्देशन पत्र नेताना नोंदवही मध्ये संबंधितांची प्राथमिक माहिती (Maval LokSabha Elections 2024)नोंदवली जात असून यामध्ये दिनांकासह नामनिर्देशन पत्र नेणाऱ्या उमेदवाराचे  नाव, पत्ता, नामनिर्देशन पत्रांची संख्या, उमेदवाराच्या वतीने त्यांचा प्रतिनिधी नामनिर्देशन पत्र घेत असल्यास त्या व्यक्तीचे नाव, राजकीय पक्षाचे नाव,  भ्रमणध्वनी क्रमांक, आदी बाबींची नोंद केली जात आहे. त्यानंतर नामनिर्देशन पत्र ताब्यात घेणाऱ्याची स्वाक्षरी घेऊन त्यास  नामनिर्देशन पत्राची प्रत दिली जात आहे.   आजसुमारे 27 व्यक्तीनी एकुण 49   नामनिर्देशन पत्रे नेली आहेत.
Loksabha election : महाविकास आघाडीतील सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि रवींद्र धंगेकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल

नामनिर्देशन पत्रे घेणाऱ्या व्यक्तींची नावे व त्यांनी  नोंदविलेल्या माहितीचा  तपशील :- अजय हनुमंत लोंढे (पिंपरी, अपक्ष), दादाराव किसन कांबळे (चिंचवड, अपक्ष), प्रशांत रामकृष्ण भगत (उरण, भारतीय जवान किसान पार्टी), मुकेश मनोहर अगरवाल (कामशेत, अपक्ष), रफिक रशीद कुरेशी (पिंपरी, बहुजन समाज पक्ष), डॉ.राजेश यशवंतराव नागोसे (पिंपरी, राष्ट्रवादी रिपब्लीकन पार्टी), विष्णू रामदास रानमारे (थेरगाव, अपक्ष), विनायक निवृत्ती पाटील (निगडी, अपक्ष), सुरज चंद्रकात गायकवाड (निगडी, अपक्ष), हजरत इमामसाहब पटेल (काळेवाडी, अपक्ष), विजय विकास ठाकूर (पनवेल, अपक्ष), मनोज भास्कर गरबडे (पिंपरी, अपक्ष), यशवंत विठठल पवार (कर्जत, क्रांतीकारी जयहिंद सेना), महेशसिंग नारायणसिंग ठाकूर (वाघबीळ ठाणे, धर्मराज्य पक्ष), गोंविद गंगाराम हेरोडे ( निगडी, बहुजन मुक्ती पार्टी), वर्षा आर्यभाणु भुताळे (देगलुर नांदेड, दिल्ली जनता पार्टी), उमाकांत रामेश्वर मिश्रा (सोमाटणे फाटा मावळ, अपक्ष), डॉ.मिलिंदराजे दिगंबर भोसले (थेरगाव, अपक्ष), रहिम मैनुददीन सय्यद (पिंपरी, आझाद समाज पार्टी), लक्ष्मण सदाशिव अढाळगे (पनवेल, अपक्ष), मधुकर दामोदर थोरात (पनवेल, अपक्ष), सु्भाष गोपाळराव बोधे (दापोडी, जनता दल धर्मनिरपेक्ष), राजेंद्र मानसिंह छाजछिडक (बोपखेल, राष्ट्रीय वाल्मीकी सेना भारतीय राष्ट्रीय जनता पार्टी  राष्ट्रीय संयुक्त आघाडी), दत्तात्रय भगवंत वाघेरे (पिंपरी, अपक्ष व शिवसेना उबाठा), तुषार दिगंबर लोंढे (चिंचवड , बहुजन भारत  पार्टी), राहुल निवृत्ती मदने (चिंचवड, बहुजन समाज पार्टी), सोमनाथ दत्तात्रय कुदळे (पिंपरी, अपक्ष)

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.