Maval Loksabha election : उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदी अद्ययावत ठेवा; भरारी पथकाने बारकाईने तपासणी करावी

निवडणूक खर्च निरीक्षक सुधांशु राय यांच्या सूचना

एमपीसी न्यूज – भारत निवडणूक आयोगाच्या निवडणूक खर्च व नियंत्रण यावरील ‘अनुदेशांचा सारसंग्रहमधील लेख्यांची तपासणी’ या तरतूदीनुसार उमेदवाराने ठेवलेल्या दैंनदिन खर्चविषयक लेख्यांची तपासणी करण्यात येत असते त्यामुळे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयासह निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय स्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक खर्चाविषयक कामकाजासाठी कक्षातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी वहित नमून्यातील नोंदी तसेच उमेदवारांनी दिलेल्या खर्चाच्या माहितीच्या नोंदी अद्ययावत ठेवाव्यात असे निर्देश निवडणूक खर्च निरीक्षक सुधांशु राय यांनी दिले. तसेच विविध भरारी पथके सातत्याने कार्यान्वित ठेवून प्रत्येक बाबीची तपासणी बारकाईने करावी अशा सूचना राय (Maval Loksabha election) यांनी यावेळी दिल्या. 

मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक खर्चाविषयी  निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून सुधांशु राय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यांनी आकुर्डी  येथील पीएमआरडीए प्रशासकीय भवनातील मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट देवून कामकाजाची माहिती घेतली, त्यावेळी राय बोलत होते. निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये स्थापित करण्यात आलेल्या विविध कक्षाची माहिती यावेळी राय यांना दिली.

यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले, समन्वय अधिकारी प्रविण ठाकरे, हिम्म्त खराडे, पुणे जिल्हा निवडणूक खर्च देखरेख पथक पुणे पदमश्री तळदेकर, मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी  कार्यालयाच्या निवडणूक खर्च तपासणी पथकप्रमुख अश्विनी मुसळे , निवडणूक निरीक्षक समन्वयकक्षाचे प्रमुख प्रमोद ओभासे, समन्वयक सुरेंद्र देशमुखे, सचिन चाटे आदी उपस्थित होते.

सुधांशु राय यांनी  मावळ लोकसभा मतदारसंघाच्या (Maval Loksabha election) निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील माध्यम कक्ष, एक खिडकी कक्ष, आचारसंहिता कक्ष, निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्ष,  ‍कायदा व सुव्यवस्था कक्ष, टपाली मतदान कक्ष अशा विविध कक्षामध्ये प्रत्यक्ष भेट देऊन येथील कामकाजाची माहिती घेतली.

LokSabha Elections 2024 :  मावळमध्ये 114 पथके; निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला

त्यानंतर मावळ, उरण, कर्जत, पनवेल,पिंपरी व चिंचवड या सहा विधानसभा मतदारसंघातील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये नियुक्त करण्यात आले आहे. निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेवून विविध निर्देश दिले. निवडणूक खर्चाची नोंद योग्य पध्दतीने घेवून प्रत्येक नोंदी अद्ययावत ठेवाव्यात तसेच बँकाद्वारे प्राप्त झालेल्या तपशीलाची माहिती संकलीत करावी, विविध भरारी पथके सातत्याने कार्यान्वित ठेवून प्रत्येक बाबीची बारकाईने तपासणी करावी अशा  सूचना राय यांनी यावेळी दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.