National Intelligence Test : प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजच्या तन्मय विश्वासरावचे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत यश

एमपीसी न्यूज –  चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेज (सी.बी.एस.ई.बोर्ड) चा 12 वीचा विद्यार्थी तन्मय विश्वासराव या विद्यार्थ्याने 2019-20 साली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदमा़र्फत आयोजित केलेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध (National Intelligence Test) परीक्षेत तन्मय विश्वासराव हा विद्यार्थी द्वितीय श्रेणी मिळवून शिष्यवृत्ती परीक्षेस पात्र ठरला आहे.

BARTI : डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे जिल्हा परिषदेमा़र्फत 15 ऑगस्ट 2022 रोजी गुणवंतांच्या पारितोषिक वितरण समारंभात तन्मय विश्वासराव या विद्यार्थ्यास महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

विद्यालयाच्या प्राचार्या सविता ट्रॅवीस यांनी विद्यार्थ्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी कमला शिक्षण संकुलाच्या अध्यक्षा प्रतिभा शहा तसेच; संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सविता ट्रॅविस यांचे विशेष कौतुक करून तन्मय विश्वासराव याला (National Intelligence Test) त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.