BARTI : डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण (BARTI) संस्थेमार्फत एमफिल व पीएचडी करण्यासाठी  देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी अनुसूचित जातीतील संशोधक विद्यार्थांना 25 सप्टेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी विद्यार्थी अनुसूचित जातीतील महाराष्ट्रातील रहिवासी असावा.  एमफिल, पीएचडीसाठी 1 जून 2021 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत कायमस्वरुपी नोंदणी असावी. विज्ञान व तंत्रज्ञान विषयामध्ये नामांकित विद्यापीठामध्ये पीएचडी करू इच्छिणाऱ्या परंतु नोंदणी न झालेल्या संशोधक विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

Talegaon Dabhade : गरोदरपणात घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन शिबीर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती- 2021 साठी 25 ऑगस्ट रोजी (BARTI) https://barti.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्राच्या साक्षांकित प्रतीसह  भरलेल्या  अर्जाची प्रत बार्टी, 28, क्वीन्स गार्डन, कॅम्प, पुणे या पत्त्यावर 30 सप्टेंबर 2022 पर्यंत पाठवावी किंवा प्रत्यक्ष येऊन सादर करावी.

याबाबत परिपूर्ण माहिती, मार्गदर्शक तत्वे, सूचना बार्टीच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती बार्टीच्या योजना विभागाचे उमेश सोनावणे यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.