Talegaon Dabhade : गरोदरपणात घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन शिबीर

एमपीसी न्यूज – इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) यांच्या वतीने गरोदर महिलांनी गरोदरपणात काय काळजी घ्यावी, आहार, व्यायाम, मानसिक संतुलन याबाबत मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. कामशेत ग्रामीण रुग्णालयात हे शिबीर पार पडले. क्लबच्या अध्यक्ष वैशाली दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिरात डॉ. लीना कवितके, डॉ. रेणुका पारवे, डॉ. क्रांती इंगळे, डॉ. राणी बच्चे व आयुर्वेद डॉ. लता पुणे यांनी मार्गदर्शन केले.
या वेळी अध्यक्षा वैशाली दाभाडे, सचिव निशा पवार, संध्या थोरात, डॉ. लीना कवितके, डॉ. रेणुका पारवे, डॉ. क्रांती इंगळे, डॉ. राणी बच्चे, डॉ. लता पुणे आदी क्लब सदस्या उपस्थित होत्या.

इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे गरोदर महिलांना मार्गदर्शन शिबिराला 130 महिलांचा सहभाग होता. कामशेत ग्रामीण रुग्णालय येथे आयोजित मार्गदर्शन शिबिरात डॉ. लीना कवितके, डॉ. रेणुका पारवे, डॉ. क्रांती इंगळे, डॉ. राणी बच्चे व आयुर्वेद डॉ. लता पुणे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. आहार कसा असावा, नित्यामध्ये कोणत्या गोष्टी टाळाव्या या वेळी संक्षिप्तपणे माहिती देण्यात (Talegaon Dabhade) आली. डॉ. लीना कवितके यांच्या सहकार्याने गरोदर महिलांना चिक्की व हिमालय कंपनीचे बेबी किट वाटप करण्यात आले.
प्रास्ताविक क्लबच्या अध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी केले. ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने डॉ. अनिल गिरी, डॉ. मेघना पदमे, डॉ. सोनल बोन्द्रे, डॉ. राखी वाघचौरे यांनी नियोजन व सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.