Markal : कंपनीतून रॉ मटेरियल चोरीला

एमपीसी न्यूज – कंपनीतून चोरट्यांनी 1 लाख रुपयांचे रॉ मटेरियल चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 19) सकाळी सात वाजता एस एस इंडस्ट्रीज प्रा. लि., मरकळ (Markal) येथे उघडकीस आली.

नवनाथ सहादू लोखंडे (वय 44, रा. मरकळ, ता. खेड) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhosri Crime : मशीन बनवून देण्याच्या बहाण्याने चार लाखांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लोखंडे हे मरकळ येथील एस एस इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत सुपरवायझर पदावर काम करतात. बुधवारी (दि. 17) मध्यरात्री साडेबारा ते शुक्रवारी सकाळी सात वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने कंपनीत प्रवेश करून कंपनीतून 1 लाख 14 हजार 198 रुपये किमतीचे रॉ मटेरियल व सामान चोरून नेले. आळंदी पोलीस (Markal) तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.