Tata Motors News : टाटा मोटर्सकडून ‘एस गोल्‍ड पेट्रोल सीएक्‍स’ लाँच

भारतातील सर्वात किफायतशीर चार-चाकी व्‍यावसायिक व्हेईकल

एमपीसी न्यूज – टाटा मोटर्स या भारताच्‍या सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने आज त्‍यांच्‍या सर्वात लोकप्रिय स्‍मॉल कमर्शियल व्हेईकल (एससीव्‍ही)ची नवीन व्‍हेरिएण्‍ट एस गोल्‍ड पेट्रोल सीएक्‍स लाँच केली. या व्हेईकलची किंमत 3.99 लाख रूपयांपासून सुरू होते. ही व्हेईकल दोन व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये उपलब्‍ध असून फ्लॅट बेड व्‍हेरिएण्‍टची किंमत 3.99 लाख रूपये आहे. तर, हाफ डेक लोड बॉडी व्‍ह‍ेरिएण्‍टची किंमत 4.10 लाख रूपये असेल.

नवीन आकर्षक दर, तसेच सुलभ फायनान्सिंग पर्यायांमुळे ग्रामीण व शहरी भागांमधील प्रथमच व्‍यावसायिक वाहन खरेदी करणा-या युजर्ससाठी ही व्हेईकल उत्तम पर्याय आहे. सुलभ खरेदी व अधिक उपलब्‍धतेसाठी टाटा मोटर्सने स्‍टेट बँक ऑफ इंडियासोबत सहयोग केला आहे. या सहयोगाच्‍या माध्‍यमातून ग्राहकांना 7,500 रूपये इतका कमी ईएमआय व जवळपास 90 टक्‍क्‍यांपर्यंत ऑन-रोड फायनान्‍सची अभूतपूर्व ऑफर मिळेल.

टाटा एस गोल्‍ड पेट्रोल सीएक्‍स व्‍हेरिएण्‍ट ही भारतातील 2-सिलिंडर इंजिनची शक्‍ती आणि एकूण वाहन वजन 1.5 टनपेक्षा अधिक असलेली एकमेव चार-चाकी एससीव्‍ही आहे. ही व्हेईकल 4 लाख रूपयांपेक्षा कमी किंमतीमध्‍ये उपलब्‍ध असणार आहे.

या व्हेईकलमध्‍ये फोर-स्‍पीड ट्रान्‍समिशनसाठी तयार करण्‍यात आलेले इंधन-कार्यक्षम व विश्‍वसनीय एस गोल्‍ड पेट्रोल 694 सीसी इंजिन आहे. नवीन व्‍हेरिएण्‍ट अधिकतम लाभासाठी निर्माण करण्‍यात आले आहे. सुधारित ग्राहक-केंद्रित धोरणे आणि टाटा मोटर्सने सादर केलेली उल्‍लेखनीय तंत्रज्ञाने व नवोन्‍मेष्‍कारांच्‍या आधारावर विकसित करण्‍यात आलेली एस गोल्‍ड पेट्रोल सीएक्‍स व्‍हेरिएण्‍ट एससीव्‍ही विभागामध्‍ये गेमचेंजर ठरेल.

मिनी ट्रक विभागामध्‍ये अग्रणी असण्‍याबाबत बोलताना टाटा मोटर्सचे प्रॉडक्‍ट लाइन – एससीव्‍ही व पीयूचे उपाध्‍यक्ष विनय पाठक म्‍हणाले, नवीन एस गोल्‍ड पेट्रोल सीएक्‍सचे लाँच, छोटा हाथीच्‍या आकर्षक प्रवासामधील आणखी एका सुवर्ण टप्‍प्‍याला अधोरेखित करते. टाटा एस प्रबळ, विश्‍वसनीय व बहुउद्देशीय वेईकल ठरत आहे. या व्हेईकलने आतापर्यंत 23 लाखांहून अधिक भारतीयांना उदरनिर्वाहाचे साधन दिले आहे.

शासनाच्‍या आत्‍मनिर्भर भारत दृष्टिकोनाशी संलग्‍न राहत टाटा मोटर्सचा या वेईकलच्‍या लाँचच्‍या माध्‍यमातून उद्योजकता विचारांना प्रेरित करण्‍याचा मनसुबा आहे. टाटा मोटर्स सातत्‍याने बदलणा-या परिवहन गरजांशी संलग्‍न राहण्‍यासोबत त्‍यांच्‍या उत्‍पादन ऑफरिंग्‍जमध्‍ये सतत सुधारणा करत व्‍यावसायिक वाहन बाजारपेठेमध्‍ये अग्रस्‍थानी राहिली आहे.

टाटा मोटर्सचे एस व्‍यासपीठ मागील 16 वर्षांमध्‍ये अपवादात्‍मकरित्‍या सर्वसमावेशक बनले आहे. या व्‍यासपीठाने शेवटच्‍या अंतरापर्यंत ग्राहकांना सुरक्षित, स्‍मार्टर व बहुमूल्‍य ऑफरिंग्‍ज दिल्‍या आहेत. आमच्‍या नवीन लाँचसह आम्‍हाला भारतीय उद्योजकांच्‍या महत्त्वाकांक्षांना पाठिंबा देण्‍याची आणि टाटा मोटर्स एस गोल्‍ड पेट्रोल सीएक्‍स भारतातील सर्वात किफायतशीर चार-चाकी व्‍यावसायिक वाहन बनण्‍याची आशा आहे.

नवीन टाटा एस गोल्‍ड पेट्रोल सीएक्‍स उपयोजनांमधील वैविध्‍यतेमुळे शेवटच्‍या अंतरापर्यंत डिलिव्‍हरी देण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी असण्‍याची खात्री देते. बाजारपेठ, लॉजिस्टिक्‍स तसेच फळे, पालेभाल्‍या व कृषी उत्‍पादने, पेये व बोटल्‍स, एफएमसीजी व एफएमसीडी सामान, ई-कॉमर्स, पार्सल व कूरियर, फर्निचर, पॅक केलेले एलपीजी सिलिंडर्स, डेअरी, फार्मा व खाद्यपदार्थ उत्‍पादने, रेफ्रिजरेटेड परिवहन यांच्‍या वितरणासाठी आणि कचरा व्‍यवस्‍थापन उपयोजनांसाठी या वेईकलचा वापर होऊ शकतो.

टाटा एस गोल्‍ड पेट्रोल सीएक्‍स भारतीय ट्रकिंग क्षेत्रामध्‍ये शेवटच्‍या अंतरापर्यंत विश्‍वसनीय व लाभदायी वितरणाची खात्री देण्‍यास आणि येणा-या काळामध्‍ये लाखो यशस्‍वी गाथा निर्माण करण्‍यास सज्ज आहे.

इतर टाटा मोटर्स व्‍यावसायिक वाहनांप्रमाणे नवीन एस गोल्‍ड पेट्रोल सीएक्‍सला संपूर्ण सेवा 2.0 उपक्रमाचे पाठबळ असेल. या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून विविध व्हेईकल केअर व सर्विस कटिबद्धता प्रोग्राम्‍स, वार्षिक मेन्‍टेनन्‍स पॅकेजेस् आणि रिसेल संधी देण्‍यात येतील. याव्‍यतिरिक्‍त 247 रोडसाइड असिस्‍टण्‍स – टाटा अलर्ट, वर्कशॉप्‍समध्‍ये वेळेवर तक्रार निवारणाची खात्री देणारे – टाटा झिप्‍पी आणि 15-दिवसाची अॅक्सिडण्‍ट रिपेअर गॅरण्‍टी – टाटा कवच यांचा लाभ देखील मिळेल, ज्‍यामधून त्‍वरित सर्विस मिळण्‍याची खात्री मिळते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.