Chinchwad : सेवाभावी डॉक्टर विकसित भारताचे ‘ॲम्बॅसिडर’!

एमपीसी न्यूज – प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्यामध्ये मंदिर (Chinchwad) आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरात दिवाळी साजरी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आपल्या पिढीला हा दिवस पहायला मिळाला. ‘‘आत्मनिर्भर भारत’’ हा मोदींचा संकल्प आहे. कोविड काळात 120 कोटी भारतीयांना लस देवून आरोग्य सेवा दिली. जगातील देशांना भारताने लस पुरवठा केला. ‘विकसित भारत… आत्मनिर्भर भारत’ या निर्धाराला साथ देण्यासाठी डॉक्टर विकसित भारत संकल्पनेचे ‘ॲम्बॅसिडर’ आहेत, असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या पुढाकाराने नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर लोकनेते दिवंगत लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अटल महाआरोग्य विनामूल्य शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिराच्या दुसऱ्या दिवशी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट दिली. त्यावेळी बावनकुळे बोलत होते. यावेळी चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप, माजी महापौर माई ढोरे, प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदेश महासचिव विक्रांत पाटील, भाजपाचे संदीप खर्डेकर, संजीवीनी पांड्ये, आरोग्य सेवाचे सहसंचालक राधाकिशन पवार, डॉ. सचिन देसाई, डॉ. लक्ष्मण गोफणे आदी मान्यवर उपस्थित होते.

Moshi : गोडाऊन समोर पार्क केलेली इको गाडी चोरीला

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचे कल्याण होईल, असे लोकनेते स्व. लक्ष्मण जगताप यांचे सूत्र होते. जीवन किती जगले, यापेक्षा कसे जगले, हे महत्त्वाचे आहेत. तसेच, ‘‘भाऊ कसा असावा? याचे आदर्श उदाहरण म्हणजे शंकर जगताप आहेत.’’ लक्ष्मण जगताप यांचे कार्य त्यांनी सक्षमपणे पुढे चालवले आहे. आदर्श पत्नी म्हणून आमदार अश्विनी जगताप लक्ष्मण (Chinchwad) जगताप यांचा वारसा चालवत आहेत, असे गौरोद्गारही प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी काढले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले. सूत्रसंचालन नाना शिवले आणि आभार माजी महापौर माई ढोरे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.