Pune : महापालिका तिजोरीत 2019 अखेर 1300 कोटींचा कर जमा

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या तिजोरीत दि. ३१ डिसेंबर,२०१९ अखेर 1300 कोटी रुपये जमा झाले आहे. बॅण्ड वाजवून संबंधितांचा थकीत कराचा डंका पिटला जात आहे़. त्यामुळे मिळकत धारकाकडून थकित मालमत्ता कराची वसुली करण्यास महापालिकेला यश आले.

थकित मालमत्ता कर वसुलीसाठी नोव्हेंबर २०१९ पासून बहुतांशी कर थकित बिगर निवासी मिळकतींसमोर बॅण्ड वाजवून, संबंधितांना थकीत कराची जाणीव करून दिली जात आहे़. थकीत कराचा आणखी गाजा-वाजा नको म्हणून मिळकतधारक थकीत कर पालिकेकडे जमा करीत आहे़. पालिकेने गेल्या दोन महिन्यात शहरातील तीन हजाराहून अधिक बिगर निवासी मिळकतींसमोर थकीत कर वसुलीसाठी हा अभिनव प्रयोग राबविला आहे़, अशी माहिती कर संकलन प्रमुख विलास कानडे यांनी दिली. गेल्या आर्थिक वर्षात महापालिकेला मालमत्ता करातून १ हजार १९५ कोटी रूपये मिळाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.