Nigdi : क्लासला जाणाऱ्या तरुणीचा पाठलाग करून विनयभंग

एमपीसी न्यूज – क्लासला जाणा-या तरुणीचा पाठलाग करून तसेच सोशल मीडियावरून मेसेज पाठवून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी 42 वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश जगताप (वय 25, रा. त्रिवेणीनगर, तळवडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार निगडी, तळवडे व चिंचवड येथे 2013 ते 11 डिसेंबर 2019 या कालावधीत घडला. फिर्यादी यांची 22 वर्षीय मुलगी एका खासगी क्लासला जात असताना आरोपीने तिचा पाठलाग केला. तसेच सोशल मीडियावरून मेसेज पाठवून तिचा विनयभंग केला. तिला व तिच्या कुटुंबाला इजा करण्याची धमकी दिली दिल्याप्रकरणी गुन्हा दखल करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.