Pimpri : तेजश्री अडिगे यांना ओरिसाचा नृत्य गरिमा पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज – कटक येथे सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय नाट्य व नृत्य महोत्सवात पिंपरी-चिंचवडमधील नृत्य कला मंदिरच्या कलावंतांनी विविध नृत्यांचे सादरीकरण केले. ओरिसा राज्यातील कटक येथे उत्कल युवा सांस्कृतिक संघ, कटक जिल्हा प्रशासन आणि ओरिसा राज्य सांस्कृतिक व पर्यटन विभाग यांच्या वतीने  नृत्य कला मंदिरच्या संस्थापिका भरत नाट्यम तेजश्री अडिगे यांना यावर्षीचा नृत्य गरिमा 2018 हा पुरस्कार प्रदान केला.   

या महोत्सवात उत्पादन शुल्क व अर्थमंत्री शशीभूषण बेहरा यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळाला. यावेळी उत्कल युवा संघाचे अध्यक्ष प्रवा पटनाईक, कटकचे आमदार देबाशीश संमात्र्य, उत्कल युवा केंद्राचे अध्यक्ष डॉ. विजयनाथ सिंग, सचिव प्रो. कार्तिक चंद्र राव, उत्कल युवा संघाचे प्रमुख कार्तिक चंद्रधर, आदी उपस्थित होते. उत्कल युवा संघाचे स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व शाल देऊन राष्ट्रीय नृत्य गरिमा पुरस्काराने तेजश्री अडिगे यांना गौरविण्यात आले. यावेळी विविध नृत्य प्रकार सादर करून नृत्य कला मंदिरच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढविली.

भारतातील चार जणांना व भारताबाहेरील चार जण यांचा समावेश होता. त्यापैकी भारतातील चार जणांमधून निगडी प्राधिकरण येथील या महोत्सवात पिंपरी-चिंचवडमधून नृत्यकला मंदिरच्या 25 जणांचा ग्रुपचा सहभाग होता. तसेच या महोत्सवात देशातील काही कलावंतासह अफगाणिस्तान, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इराण, इटली, जपान, स्पेन,  मेक्सिको, मलेशिया, नेपाळ सौदी, अरेबिया, सिंगापूर, थायलंड येथील कलाकारांनी कला सादर केली. येथील कलाप्रेमींनी पुरस्कार प्राप्त कलावंतांचे अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.