Mhalunge Crime News : कंपनीत पाण्याचा टँकर पुरविण्यावरून झालेल्या खूनातील 5 महिन्यापासून फरार आरोपीला बीड मधून अटक

एमपीसी न्यूज – एमआयडीसी कंपनीत पाण्याचा टँकर पुरविण्याच्या कारणावरून म्हाळुंगे अतुल तानाजी भोसले (वय 26) यांचा 14 मे 2021 रोजी खून झाला होता. या खूनाच्या गुन्ह्यातील पाच महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला बीड येथून अटक करण्यात आली आहे. म्हाळुंगे पोलिसांनी आज (शनिवारी, दि.09) ही कारवाई केली.

सौरभ विद्यासागर सोनवणे (वय 21, रा. च-हाटा, ता.जि-बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. यापूर्वी या गुन्ह्यातील अटक 11 आरोपी येरवडा कारगृहात कैद आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी कंपनीत पाण्याचा टँकर पुरविण्याच्या कारणावारून म्हाळुंगे अतुल तानाजी भोसले (वय 26) यांचा 14 मे 2021 रोजी खून झाला होता. तळेगाव दाभाडे येथील रेणुका हॉटेलसमोर अतुल यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांचा खून करण्यात आला होता.

याप्रकरणी 11 आरोपींना अटक करण्यात आली होती, पण सौरभ सोनवणे हा आरोपी पाच महिन्यापासून फरार होता. म्हाळुंगे पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीला बीड येथून ताब्यात घेतले. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.