Moshi : बोऱ्हाडेवाडीतील प्राधिकरणाची जागा महापालिकेकडे हस्तांतरीत होणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची सुमारे साडेआठ हजार चौरस मीटर मोकळी जागा पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. त्यासाठी एक रुपये नाममात्र शुल्क आकारण्यात आले आहे.

बो-हाडेवाडी येथील नागरिकांना आवश्यक असणा-या उद्यान, खेळाचे मैदान, शाळा, तसेच अन्य विविध सुविधा उपलब्ध नाहीत. त्यासाठी प्राधिकरणाच्या हद्दीतील जागा महापालिकेने ताब्यात घ्यावी, अशी मागणी स्थानिक नगरसेवकातर्फे करण्यात आली होती. त्यानुसार प्राधिकरणाकडील मोकळी जागा महापालिकेच्या ताब्यात देण्याबाबत कळविण्यात आले होते. त्यानंतर प्राधिकरणातर्फे पेठ क्रमांक 14  मधील 8501 चौरस मीटर मोकळी जागा महापालिकेकडे हस्तांतरण करण्यात आले.

मात्र, तसा प्रस्ताव महापालिका आयुक्तांच्या स्वाक्षरीने पाठविण्याबाबत प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कळविले. त्यानुसार भाडेपट्टा करार होऊन या जागेसाठी एक रुपये नाममात्र शुल्क आकारण्यात आले आहे. या खर्चाबरोबरच भाडेपट्टा करार नोंदविण्यासाठी अपेक्षित सर्व खर्च महापालिकेतर्फे करण्यात येणार आहे. त्याला स्थायी समिती सभेने मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.