Maval : मिनी बँकेत साठवलेले खाऊचे पैसे चिमुरडीने दिले गरजूंच्या मदतीसाठी

एमपीसी न्यूज – आई-वडील व नातेवाईकांकडून वेळोवेळी खाऊसाठी मिळालेले पैसे मिनी बँकेत साठवून मावळ तालुक्यातील कान्हे गावच्या सेजल भरत सातकर हिने ती रक्कम समाजातील गरजूंच्या मदतीसाठी तळेगाव दाभाडेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांच्याकडे मोठ्या विश्वासाने सुपूर्द केली. तिच्या या सामाजिक जाणिवेचे कान्हे परिसरात चांगलेच कौतुक होत आहे.  

सुनील शेळके त्यांच्या गाव भेट दौऱ्यात कान्हेगावात गेले गेलेले असताना गावातील एक चिमुकली सेजल भरत सातकर या मुलीने वर्षभर आपल्याला खाऊसाठी मिळालेले पैसे साठवून समाजसेवेसाठी अथवा समाजातील गरजूंच्या मदतीसाठी मोठ्या विश्वासाने शेळके यांच्या हाती सुपूर्द केले.

तिने दाखवलेल्या विश्वासाचे शेळके तसेच गावकऱ्यांनी सेजलचे कौतुक केले. तिच्याकडून मिळालेल्या रकमेचा वापर समाजातील गरजूंसाठी योग्य प्रकारे केला जाईल आणि त्या प्रत्येक रुपयाचा हिशेब दिला जाईल, अशी ग्वाही शेळके यांनी तिला दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.