Chinchwad : बँक खात्याची गोपनीय माहिती विचारून तरुणाला एक लाखाचा गंडा

एमपीसी न्यूज – बँक खात्याची गोपनीय माहिती विचारून महिलेने तरुणाला एक लाखांचा गंडा घातला. हा प्रकार चिंचवड मधील वाल्हेकरवाडी येथे घडला.

अनिकेत अशोक बाचल (वय 31 रा. साई हाऊसिंग सोसायटी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राधा गुप्ता (रा. गल्ली नंबर 60, बीसादा, ता. दादरी, जि. गौतम बुद्धनगर, उत्तर प्रदेश) या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्ता या तरुणीने अनिकेतच्या बँक खात्याची गोपनीय माहिती इंटरनेटच्या माध्यमातून चोरली. त्यातून अनिकेतच्या क्रेडिट कार्ड आणि त्याचा ओटीपी माहिती करून घेतला. मिळालेल्या माहितीवरून गुप्ताने अनिकेतच्या क्रेडिटकार्ड वरून एक लाख रुपये काढून घेतले. अनिकेत आणि गुप्ता यांची फोनवर ओळख होती. त्यांनी एकमेकांना कधीही पहिले नव्हते. एक लाख रुपये काढल्यानंतर अनिकेतने गुप्ताला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अनिकेतने चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजित खुळे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.