Nigdi News: वडिलांनी त्यांच्या मजुरीचे पैसे मागितल्याने मुलावर तलवारीने वार

फिर्यादी तौसिफ यांचे वडील मेहबूब अतनूर हे आरोपींकडे कामाला होते. त्यांनी त्यांच्या मजुरीचे पैसे आरोपींकडे मागितले.

एमपीसी न्यूज – वडिलांनी त्यांच्या मजुरीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून चार जणांनी मिळून पैसे मागणा-या मजुराच्या मुलाला बेदम मारहाण करत तलवारीने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (दि.16) रात्री पावणेदहा वाजता निगडी-भोसरी रोडवर पत्रा शेड, दुर्गानगर येथे घडली.

तौसिफ मेहबूब अतनुर (वय 18, रा. दुर्गानगर झोपडपट्टी, निगडी-भोसरी रोड, निगडी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार अनिल सरोदे (वय अंदाजे 40), मयूर अनिल सरोदे (वय 20, रा. ओटास्कीम, निगडी), गौरव अनिल सरोदे (वय 19), शफिक मोदिन शेख (वय 21, रा. मोरेवस्ती, चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी मयूर आणि शफिक या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तौसिफ यांचे वडील मेहबूब अतनूर हे आरोपींकडे कामाला होते. त्यांनी त्यांच्या मजुरीचे पैसे आरोपींकडे मागितले. या कारणावरून आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांच्या घरात जबरदस्तीने घुसून कोयता आणि तलवारीने तौसिफ यांच्यावर वार केले. यामध्ये तौसिफ यांच्या हातावर, पायावर गंभीर दुखापत झाली.

मारहाण केल्यानंतर आरोपींनी तौसिफ यांच्या घरातील कपाट, टीव्ही आणि इतर साहित्याची तोडफोड करून नुकसान केले. पोलिसांनी आरोपी मयूर आणि शफिक या दोघांना अटक केली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.