Pune News: राज्यपालांशी महापौरांनी साधला दिलखुलास संवाद

महापौर आणि राज्यपाल यांच्यामध्ये पुणे शहरातील विविध समस्यांबाबतही चर्चा झाल्याचे समजते.

एमपीसी न्यूज – काँग्रेस-राष्ट्रवादी- शिवसेना महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे राजकीय वजन कमालीचे वाढले आहे. पुणे दौऱ्यावर असताना महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही राज्यपालांसोबत दिलखुलास संवाद साधला.

कमालीचा उत्साह, अभ्यासपूर्ण चर्चा आणि आदबीने मिळणारा प्रतिसाद यामुळे राज्यपालांशी होणारा संवाद नवी ऊर्जा देऊन जातो. आजही जवळपास अर्धा तास विविध विषयांवर झालेली चर्चा मला नवनवीन गोष्टी शिकवून गेली, अशी उत्साही प्रतिक्रिया महापौर मोहोळ यांनी दिली.

महापौर आणि राज्यपाल यांच्यामध्ये पुणे शहरातील विविध समस्यांबाबतही चर्चा झाल्याचे समजते. महाविकास आघाडीत विविध निर्णय घेण्यावरून सरकार आणि राज्यपाल यांच्यात खटके उडत असतात. त्याच पार्श्वभूमीवर राज्यपाल सुद्धा राज्यातील विविध समस्यांचा आढावा घेत आहेत.

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल यांचा पुणे दौरा चांगलाच चर्चेचा ठरला. त्यांनी शिवनेरी किल्ला पायी सर केल्याने सोशल मीडियावर तुफान प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 15 ऑगस्ट निमित्ताने उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्याशीही राज्यपालांनी संवाद साधला. खासदार गिरीश बापट यांच्याशीही हस्तांदोलन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.