Nigdi : बेकायदेशीर पिस्तुल बाळगल्या प्रकरणी महाकाली टोळीतील सदस्याला अटक; दोन पिस्तुल जप्त

एमपीसी न्यूज – बेकायदेशीर पिस्तुल बाळगल्याप्रकरणी महाकाली टोळीतील एकाला निगडी पोलिसांच्या तपास पथकाने अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्तुल आणि सहा जिवंत काडतुसे असा एकूण 91 हजार 600 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई निगडी मधील ट्रान्सपोर्टनगर येथे करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

साजन मन्नु मेहरा (वय 25, रा. महात्मा गांधी शाळेजवळ, देहूरोड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी मधील ट्रान्सपोर्टनगर येथे पीएमपीएमएल च्या भिंतीजवळ एकजण संशयितरित्या थांबलेला आढळून आला. याबाबत माहिती मिळताच निगडी पोलिसांच्या तपास पथकाने सापळा रचून साजन याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी पिस्टल आणि त्यात चार जिवंत काडतुसे आढळली. त्यावरून त्याला अटक करून कसून चौकशी केली असता त्याच्याकडे आणखी एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे आणि एक खाली मॅगझीन मिळाली. तो महाकाली टोळीतील सदस्य असून त्याच्यावर देहूरोड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, अग्निशस्त्र बाळगणे याबाबत चार गुन्हे दाखल आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.