Pune : अनैसर्गिक कृत्याच्या मागणीला कंटाळून केला मुलाने केला खून

एमपीसी न्यूज – सततच्या अनैसर्गिक कृत्याच्या मागणीस कंटाळून एकाचा गळा चिरून खून केल्याचा धक्कादायक प्रकार लोणी काळभोर येथे  रविवारी (दि.16) घडला आहे.  याप्रकरणी शुभम बाळासाहेब आंबेकर आणि मयूर संतोष माने या दोघांना अटक केली आहे.

बापु रामा केसकर (वय 48) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बापु केसकर यांचा कोरेगाव बाळू गावच्या हद्दीत गळा कापलेल्या अवस्थेत मृतदेह. मिळाला होता. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी चौकशी केली असता मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शुभम व  मयूर माने यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यातील
मयूर माने  याने खून केल्याचे कबूल केले.

बापू  केसकर हा मयूर मानेला सतत फोन करून बोलाऊन घेऊन त्याच्यासोबत अनैसर्गिक संभोगाची मागणी करायचा परंतु मयूर त्यास नकार द्यायचा. परंतु काम मिळवून देण्याच्या आमिषाने त्याला बोलावून अनैसर्गिक संभोगाची मागणी करत असल्यामुळे त्या गोष्टीचा राग मनात धरून मयूरने बापु केसकरला कोरेगाव मुळ येथील जंगलात बोलावून घेतले. त्यानंतर त्याला मारहाण करून धारधार चाकूने  त्याचा गळा कापून खून केला.  मयूर संतोष माने  तसेच गुन्ह्यातील साथीदार  शुभम बाळासाहेब आंबेकरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास चालू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.