Pune : पुणे शहर आणि जिल्ह्यातील सर्व शाळा उद्या राहणार बंद

एमपीसी न्यूज – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या राज्यभर मराठा क्रांती मोर्चा कडून ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे बंदच देखील आवाहन करण्यात आहे. त्यामुळे बंदच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळा महाविद्यालय बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आदेश दिले आहेत.

9 अॉगस्ट 2018 रोजी मराठा क्रांती मोर्चा यांनी राज्यव्यापी महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे त्या अनुषंगाने शाळा व शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव सर्व प्राथमिक माध्यमिक व मनपा खाजगी व्यवस्थापन सर्व माध्यमिक शाळांना सुट्टी देण्यात यावी तसे सदरची सुट्टी ही स्थानिक सुट्टी म्हणून ग्राह्य धरण्यात यावी असे निवेदन दिपक माळी शिक्षणाधिकारी माध्यमिक व तांत्रिक शिक्षण पुणे महानगरपालिका आणि शिवाजी दौंडकर प्रशासकीय अधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग पुणे महानगरपालिका यांनी काढलं आहे .

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.