Dehuroad : खंडणी मागितल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – व्यापा-याला खंडणी मागितल्या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 27) ज्योतिबानगर तळवडे येथे घडली.

विपीन रामकला अगरवाल (वय 29, रा. टायटेनियम पार्क स्ट्रीट, काळेवाडी फाटा) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पंचकुला कतरु गायकवाड (रा. संजय गांधी नगर, काळेवाडी रोड, पिंपरी), दिनकर ओव्हाळ, मिलिंद आनंद शादृल, विजय आनंद मोरे (तिघे रा. नढेनगर, काळेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विपीन तळवडे येथे व्यापार करतात. त्यांना दमदाटी करत आरोपींनी 5 हजार 100 रुपयांची खंडणी मागितली. विपीन यांनी त्यांना खंडणी दिली. त्यानंतर आरोपींनी तळवडे येथील रश्मी फॅब्रिकेटर्स या कंपनीच्या मालकाला 7 हजार 500 रुपयांची खंडणी मागितली. यावरून विपीन यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.  देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.