Pune : अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना काल शुक्रवारी (दि २६ ) रात्री साडे अकराच्या दरम्यान बेंगलोर-मुंबई महामार्गावर वडगाव पुलाच्या मध्यभागी घडली.

महेश आत्माराम कापरे (रा. तळजाई वसाहत, पद्मावती, पुणे) असे अपघातात दुर्देवी मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, महेश कापरे हे बेंगलोर-मुंबई महामार्गावरुन चालत जात असताना एका अज्ञात वाहक चालकाने त्यांना गंभीररीत्या जखमी केल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात रात्रीच्या वेळी झाल्याने वाहनचालक अपघाताच्या ठिकाणी न थांबता महेश कापरे यांना तिथेच सोडून पळून गेला. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.